December 10, 2022

रामनाथ खोड प्रकरणात पेठ बीड पोलिसांचे व्यापाऱ्याला अभय !!

रामनाथ खोड प्रकरणात पेठ बीड पोलिसांचे व्यापाऱ्याला अभय !!

बीड- शहरातील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ खोड यांच्याशी संबंधित जुना मोंढा भागातील जागेच्या प्रकरणात न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. असे असतानाही व्यापारी आसाराम चांडक यांनी बांधकाम सुरूच ठेवले असल्याचा आरोप खोड यांनी केला असून पेठ बीड पोलिसांकडून त्याला अभय दिले जात असल्याचे म्हटले आहे.

शहरातील जुना मोंढा येथील दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी रामनाथ खोड यांच्या दुकानाचे शेड पाडून त्यांच्या दुकानातील साहित्याचे नुकसान केले. त्यातून वाद उद्भभवला अन या वादातूनचं रामनाथ खोड यांच्या ८० वर्षाच्या वयोवृद्ध आई, बहिणीवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. यात पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव करण्यात येत असल्याचे सातत्याने समोर आलेले आहे. पोलिसांनी वाद घडलेल्या जागेत खोड आणि चांडक यांना कलम १४९ अन्वये नोटीस बाजावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, याकरिता न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत जागेत जाण्यास प्रतिबंध घातले होते. पोलिसांनी केवळ रामनाथ खोड यांना या नोटीसचे पालन करायला लावले आणि चांडक यांना प्रतिबंध घातलेल्या वादग्रस्त जागेत बांधकाम करण्यास खुली सहमती दिल्याचे दिसून येते . याची तक्रार खोड यांनी पोलीस अधीक्षकांकडे केल्यानंतर दिखाऊपणा करत नोटीसचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी हात वर केले.

केवळ बांधकाम बंद केल्याचा बनाव करत वरिष्ठांची दिशाभूल केली. जिल्हा व सत्र न्यायालयात चालू असलेल्या किरकोळ अपील क्र.९०/२२ यात दि.५ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयाने बांधकाम करु नये व बांधकाम पाडू नये असे पुढील ११ तारखेपर्यंत तोंडी आदेश दोन्ही वकिलांना आणि वादी प्रतिवादी यांना समक्ष दिले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतरही हे बांधकाम चांडक यांनी चालूच ठेवले. यासंबधी हे प्रकरण दि.७ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यायालयात मांडून न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तेव्हा न्यायालयाने पुढील 11 तारखे पर्यंत अनाधिकृत बांधकाम करु नये व बांधकाम पाडू नये दोन्ही पक्षकारास देऊन त्या वादग्रस्त जागेत जाण्यास प्रतिबंध घातल्याचे लेखी आदेश दिले.

न्यायालयाच्या आदेशानंतरही त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम सुरुच ठेवले. याप्रकरणी पेठ बीड पोलिसांना दि.८ नोव्हेंबर २०२२ रोजी वेळ ११.३५ या दरम्यान न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन चालू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्याबाबत तक्रार दिली. त्यावेळी देखील पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार देत दिवाणी प्रकरण असल्याने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. मात्र पोलिसांनी त्याठिकाणी चांडक यांना बोलावून घेऊन तुझे काम तात्काळ आवरून घे असे सांगितले. चांडक याने कामाच्या ठिकाणी आडवी ताडपत्री लावून आत न्यायालयाचा आदेश झूगारत रात्री पर्यंत बांधकाम चालूचं ठेऊन समोर नवीन शटर लावून घेतले आहे, बांधकाम करु नये असा न्यायालयाचा आदेश असताना न्यायाल्याच्या आदेशाचा अस्वमान करत रात्रभर त्या वादग्रस्त्त जागेत बांधकाम सुरुच ठेवले असा आरोप तक्रारदार रामनाथ खोड यांनी केला आहे.

बांधकाम चालूच असल्याबाबत अनेक तक्रारी पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना केल्या. परंतु घटना घडल्यापासून एकही तक्रार घेतली नाही. आम्ही या सर्व तक्रारी मेलद्वारे पाठवल्या, तरी देखील पोलिसांनी दखल घेतली नाही, असा आरोप रामनाथ खोड यांनी केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click