December 10, 2022

ठेवीदारांचे पैसे गुन्हेगारांच्या घशात ! पूर्णवादित निरंतरांचा प्रताप !!

ठेवीदारांचे पैसे गुन्हेगारांच्या घशात ! पूर्णवादित निरंतरांचा प्रताप !!

बीड- पारनेरकर महाराज यांच्या आशीर्वादावर अन विजयकुमार वझे यांच्या मेहनतीवर सुरू झालेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेत चेअरमन डॉ अरुण निरंतर आणि हेड ऑफिसच्या चार दोन चमच्यानी उच्छाद मांडला आहे.लाखो ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेले पैसे चोरा चिलटाच्या घशात घालण्याचा निरंतर अँड कंपनीचा उद्योग समोर आला आहे.या प्रकरणात कर्ज मंजूर करणारे बँकेचे अधिकारी, वसुली अधिकारी आणि चेअरमन यांच्यावर देखील कारवाई होण्याची गरज आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शाखेचे जाळे असणाऱ्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या कारभारात मुख्य शाखेतील दोन चार अधिकारी हे चेअरमन डॉ निरंतर यांना घोळात घेतात अन मनमानी करतात.आपल्या जवळच्या लोकांना कर्ज देणे,बेकायदेशीर ओटीएस करणे,पार्ट्या घेऊन कर्ज मंजूर करणे असे अनेक प्रकार बँकेत आजवर घडले आहेत.

मात्र नुकताच एक नवा प्रकार समोर आला आहे.2013 साली परमेश्वर नाझरकर या व्यक्तीला एक कोटी 20 लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले.पुन्हा 2015 साली तीस लाखांचे कर्ज दिले.हे कर्ज देताना अंबड तालुक्यातील धकलगाव येथील जमीन तारण ठेवण्यात आली.

पंरतु ही जमीन नाझरकर याची नव्हती.तरीदेखील बँकेत कर्ज मंजूर विभाग,वसुली विभाग आणि तत्कालीन सीईओ यांनी चेअरमन डॉ निरंतर यांच्याकडून नाझरकर यांना कर्ज मिळवून दिले.त्या बदल्यात या अधिकाऱ्यांनी बराच आर्थिक फायदा करून घेतला.

विशेष बाब म्हणजे नाझरकर याने घेतलेले कर्ज थकल्यानंतर त्याच्याविरुद्ध सहकार न्यायालयात दाद मागण्याऐवजी बँकेने कोणतीच कारवाई केली नाही.एवढेच नाही तर नाझरकर याने खोटी कागदपत्रे देऊन बँकेची फसवणूक केली म्हणून पोलिसात गुन्हा दाखल करणे आवश्यक असताना बँकेचे चेअरमन निरंतर अँड कंपनीने नाझरकर ला मोकाट सोडून दिले.

बँक ही ठेवीदार आणि सभासद यांच्या जीवावर चालते.निरंतर अँड कंपनी म्हणजे देखरेखीसाठी नेमलेले मुकादम आहेत याचा बहुतेक त्यांना विसर पडला असावा.त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईक,बगलबच्चे यांना कोट्यवधी रुपयांची कर्जे खैरातीप्रमाणे वाटली.आता वसुली होत नसताना कारवाई देखील जाणीवपूर्वक टाळली जात आहे.मात्र ठेवीदारांच्या पैशाचा असा वापर करताना या लोकांना थोडीसुद्धा लाज कशी वाटली नाही अशी चर्चा होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click