December 10, 2022

शिक्षक बदल्याना मुहूर्त लागेना !

शिक्षक बदल्याना मुहूर्त लागेना !

बीड- राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या दिवाळी नंतर होतील अस शिक्षण विभागाने जाहीर केले,मात्र तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने अद्याप बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली नाही. त्यामुळे बदलीसाठी प्रयन्त करणारे शिक्षक हैराण झाले आहेत.

वेळापत्रकानुसार शिक्षकांच्या बदल्या करणे अपेक्षित असतानाही जिल्हा परिषद शिक्षण विभागाने या पत्रानुसार कार्यवाही न केल्याने शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींनी बदलीनुसार नियोजन केले आहे. मात्र, त्यांचेही हे नियोजन आता कोलमडण्याची शक्यता आहे.


ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ३१ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २२ या कालावधीमध्ये अवघड क्षेत्रांची यादी, बदली पात्र आणि बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या याद्या जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, 8 नोव्हेंबर उजाडला असतानाही ही यादी शिक्षण विभागाने जाहीर केल्याच नाही.

दरम्यान, वेळापत्रकानुसार ५ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत संवर्ग एक आणि संवर्ग २ या संवर्गातील शिक्षकांना बदली हवी आहे की नाही, याबाबतचे अर्ज करणे आवश्यक आहे. मात्र, बदलीपात्र शिक्षकांच्या अद्यापही याद्याच न लागल्याने, या संवर्गातील शिक्षकांमध्येही गोंधळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, वेळापत्रकानुसार याद्या जाहीर तर केल्या नाहीच, दुसरीकडे बदलीपात्र शिक्षकांना या संदर्भात काहीच माहिती दिली नसल्याचेही शिक्षकांचे म्हणणे आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click