December 10, 2022

तिरुमला गोल्ड चा आता दक्षिणेत डंका !

तिरुमला गोल्ड चा आता दक्षिणेत डंका !

बीड – बीड येथील प्रतिथयश कुटे ग्रुपच्या तिरुमला गोल्ड या खाद्यतेलाचे शानदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार (दि.6) रोजी लॉन्चिंग करण्यात आले. यापूर्वी तिरुमला खाद्यतेल देशभरात ग्राहकांसाठी उपलब्ध होते. आता या लॉन्चिंगनंतर दक्षिणेतील कर्नाटक, आध्रंप्रदेश,तेलंगणा, केरळ तामिळनाडू, ओरिसा या सहा राज्यात गुणवत्तापूर्ण खाद्यतेल म्हणून ओळख असलेल्या तिरुमला गोल्ड बॅ्रन्ड ग्राहकांना नव्या स्वरुपात भेटीला आला आहे. विशेष म्हणजे तिरुमला गोल्डची ब्रँन्ड अँबेसिटर म्हणून दक्षिणेसह बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री तमन्ना भाटिया काम करत आहे. ‘सबकी टॉप चॉईस, तिरुमला गोल्ड ऑईल’ हे ब्रीदवाक्य म्हणत अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी तिरुमला गोल्ड खाद्यतेलाच्या लॉन्चिंगला ऑनलाईन उपस्थिती दर्शवली.

तिरुमला गोल्ड खाद्यतेलाच्या लॉन्चिंगप्रसंगी कुटे ग्रुपच्या आधारवड राधाकाकू कुटे, संस्थापक सुरेश कुटे, व्यवस्थापकीय संचालक सौ.अर्चना कुटे, ओएओ इंडिया कंपनीचे सीईओ आर्यन सुरेश कुटे, संचालक आशिष पाटोदकर, यशवंत कुलकर्णी यांच्यासह युनिट प्रमुख उपस्थित होते.


बीड तालुक्यातील मोची पिंपळगाव येथील तिरुमला ऑईल इंडस्ट्रीजच्या भव्य प्रांगणात हा शानदार लॉन्चिंग सोहळा आयोजीत करण्यात आला होता. तत्पूर्वी सर्व मान्यवरांच्या हस्ते पडदा ओढून तिरुमला गोल्डच्या आकर्षक स्वरुपातील दहा,पाच व 1 लिटर खाद्यतेलाच्या कॅन व पाऊचचे या सोहळ्यात विमोचन करण्यात आले.याप्रसंगी दक्षिण भारतातील सहा राज्यातील तिरुमला गोल्ड खाद्यतेलाचे वितरक, वरिष्ठ अधिकारी,कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिनेत्री तमन्ना भाटिया यांनी केलेल्या तिरुमला गोल्ड खाद्यतेलाच्या तमिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदी भाषेतील जाहिरातीचे यावेळी विमोचन करण्यात आले.


याप्रसंगी कुटे ग्रुपचे संस्थापक सुरेश कुटे यांनी उपस्थितांशी तिरुमला गोल्ड खाद्यतेलाच्या लॉन्चिंगमागची पार्श्वभूमी सांगीतली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेवून आम्ही उद्योग क्षेत्रात काम करतो आहोत. जो माणूस मातीशी जोडला आहे तो चूकीचे काम कधीच करत नाही, आणि जमिनीशी जोडून राहणे हेच आमच्या कुटे ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. आमचे आधारस्तंभ स्व.ज्ञानोबा कुटे अर्थात अण्णांनी आम्हाला त्याग आणि समपर्णाची शिकवणूक दिली आहे. त्यामुळेच या प्रेरणेने आम्ही आणि आमचा गु्रप अविरत काम करतो आहे.कंफर्ट झोन सोडून आणि प्रत्येक संकटाचा सामना करत आम्ही नवनवीन उत्पादने बाजारात आणून ग्राहकाभिमुख सेवा देत आहोत. उत्पादनाच्या दर्जाबाबत कसलीही तडजोड आम्ही करत नाहीत. त्यामुळेच उत्पादनाच्या निर्मिती प्रक्रियेत ग्राहकांच्या कुटूंबाच्या आरोग्याला आम्ही प्रथम प्राधान्य देत आहोत. गुणवत्ता, सेवा आणि ग्राहकांची विश्वासार्हता या त्रिसुत्रीवरच कुटे गु्रप कायम प्रगतीपथावर वाटचाल करतो आहे. या उपक्रमात कुटे गु्रपच्या सर्व सदस्यांची प्रचंड मेहनत आहे. आमच्या गरजा छोट्या आहेत मात्र जिद्द मोठी आहे. त्यामुळेच बीडमध्ये बसून जागतिक पातळीवर कार्पोरेट क्षेत्रात आम्ही काम करतो आहोत. आता बीडमध्ये परदेशी गुतंवणूकदार आणि बँकर्स कुटे गु्रपमध्ये गुंतवणूक करत आहेत, हीच आमच्या कामाची पावती आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click