December 10, 2022

भरमसाठ रिक्तपदे, जुने नियम,कमी मनुष्यबळ, मुंढे साहेब सांगा काम करायचं कस ?

भरमसाठ रिक्तपदे, जुने नियम,कमी मनुष्यबळ, मुंढे साहेब सांगा काम करायचं कस ?

बीड- जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार एक हजार नागरिकांमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. मात्र राज्यात 1981 च्या जनगणनेच्या आधारावर डॉक्टर आणि स्टाफ ची नियुक्ती केलेली आहे.त्यामुळे भरमसाठ पदे रिक्त आहेत.कमी मनुष्यबळ असताना अन जुने नियम लागू असताना 24 तास चांगली आरोग्य सेवा द्यायची कशी ? असा सवाल उपस्थित करत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अगोदर नियम बदलावेत,रिक्तपदे भरावीत अन मग चांगल्या आरोग्य सुविधेचा धाक दाखवावा अशी ओरड कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आरोग्य यंत्रणेला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू केला.मात्र त्याला अधिकारी आणि कर्मचारी वर्गातून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे.

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव चित्र अभ्यासल्यास अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.1981 च्या जनगणना नुसार डॉक्टर आणि स्टाफ ची पदे मंजूर आहेत.त्यातील 30 टक्के पदे सेवानिवृत्ती किंवा इतर कारणामुळे रिक्त आहेत.आहे त्या लोकांवर राज्यातील बारा कोटी जनतेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी कर्मचारी जीवाचे रान करत आहेत.

याबाबत न्यूज अँड व्युज ने सखोल माहिती घेतली असता 30 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशा सूचना आणि कायदा आहे.परिस्थिती मात्र नेमकी उलटी आहे.वडवणी,शिरूर,पाटोदा या सारख्या तालुक्यांचा अभ्यास केल्यास लक्षात येते की,70 हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या कार्यरत आहे.

बीड जिल्ह्याची लोकसंख्या आजमितीस 27 ते 28 लाखाच्या घरात आहे.म्हणजे किमान किमान 90 प्राथमिक आरोग्य केंद्र असणे आवश्यक आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ 50 आरोग्य केंद्र आहेत.या ठिकाणी देखील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही.

बीड जिल्हा रुग्णालयाचा विचार केला तर 300 खाटाचे रुग्णालय असताना आज 500 च्या आसपास रुग्ण या ठिकाणी उपचार घेत आहेत.मात्र भुलतज्ञ दोन,शल्य विशारद तीन ,एमडी एम एस डॉक्टर पाच अशी अवस्था आहे.मग या डॉक्टर मंडळींनी एवढ्या रुग्णावर उपचार करायचे कसे.अशीच अवस्था ग्रामीण भागात देखील आहे.

एकीकडे आयुक्त तुकाराम मुंढे हे शिस्तीच्या नावाखाली अतिरेक करत असताना दिल्या जाणाऱ्या सुविधा बाबत मात्र एक अक्षर बोलायला तयार नाहीत.आरोग्य विभागात सुधारणा करावयाची असल्यास साडेतीन ते चार हजार डॉक्टर मंडळींची रिक्त असलेली पदे,तसेच स्टाफ नर्स,ब्रदर,टेक्निशियन यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून त्या ठिकाणी सुसज्ज यंत्रणउभारने आवश्यक आहे.

डातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार अशी परिस्थिती आरोग्य विभागाची झालेली आहे.जर रिक्तपदे भरली गेली,आरोग्य केंद्राची संख्या वाढली,पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले तरच आरोग्य व्यवस्था सुरळीत होऊ शकते.अन्यथा आहे त्या लोकांना देखील नोकरी सोडून देण्याची वेळ येईल हे नक्की.याबाबत मुंढे यांनी शासन स्तरावर आपले वजन वापरून कारवाई करणे आवश्यक आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click