December 10, 2022

काळ्या फिती लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन !

काळ्या फिती लावून आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन !

बीड- राज्याचे नवनियुक्त आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अति जाचक अटी आणि शिस्तीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले. शिस्तीच्या नावाखाली अतिरेक होत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये मुंढे यांच्या कार्यपद्धती बद्दल असंतोष निर्माण झाला आहे.

आरोग्य विभागाच्या आयुक्त पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला.चोविस तास मेडिकल ऑफिसर हजर असावा,कर्मचाऱ्यांनी जीन्स,टी शर्ट घालू नये,सर्व प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी मूळ पदस्थापनेवर पाठवावेत,वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे असे अनेक नियम पाळण्याचे आदेश मुंढे यांनी दिले.

मात्र प्रत्यक्षात फिल्डवरील परिस्थिती ची जाणीव त्यांना नसल्याने हे सगळे आदेश त्यांनी दिल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.एका प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय अधिकारी असेल तर त्याने 24 तास ड्युटी कशी करायची,साफ सफाई करायला कर्मचारी नसतील,त्यांची पदे भरलेली नसतील तर डॉक्टर मंडळींनी झाडू हातात घेऊन काम करायचे का?व्हीसी असताना ड्युटी करायची की नाही?प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरक्षा रक्षक नसतील तर कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी कोण घेणार ? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

त्यामुळे आयुक्त मुंढे यांच्या कार्यपद्धती विरोधात बीड जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले.

यावेळी कर्मचाऱ्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत.२४/७ आरोग्य सेवा असेल तर तीन शिफ्ट मधे काम करणारे मनुष्य बळ phc la भरा.
१००% काम पाहिजे तर 100% कर्मचारी भरा.
मुख्यालयी म्हणजे कार्यालयापासून किती अंतर पर्यंत याचा शासन निर्णय दाखवा.
phc लेव्हल ला होणाऱ्या स्थानिक त्रास टाळण्यासाठी एक सुरक्षारक्षक २४/७ phc la असावा.


तुम्हाला स्वच्छता हवी आहे तर सफाई कामगार भरा.
ड्यूटी hours फिक्स करा. reporting फक्त ड्यूटी hours मधेच मागा.
V.C.होणार असेल तर एक दिवस अगोदर त्याची माहिती देणे आणि ति ड्यूटी hours मधेच असावी.आणि V.C. चालू असताना ओपीडी कोणी काढायची याचे आदेश निर्गमित करा.

आयुक्त मुंढे यांच्या शिस्तीच्या नावाखाली होत असलेल्या अतिरेकी वागणुकीमुळे काम करणे अवघड झाले आहे.काम करून घ्यायचे असेल तर सुविधा देखील द्या ,रिक्त पदे भरा अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click