December 10, 2022

आयुक्तच जेव्हा टी शर्ट जीन्स घालतात !

आयुक्तच जेव्हा टी शर्ट जीन्स घालतात !

बीड- आरोग्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर सर्व रुग्णालयात स्टाफ ने जीन्स आणि टि शर्ट घालून काम करू नयेत असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिल्याने खळबळ उडाली होती. मात्र स्वतःच्याच आदेशाला स्वतः मुंढे यांनीच हरताळ फासल्याने चर्चा होत आहे.आयुक्त मुंढे हे स्वतःच टी शर्ट अन जीन्स घालून भेटी देत असल्याचे दिसल्याने या गोष्टींची कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

आपल्या कठोर अन शिस्तप्रिय कारभारामुळे प्रशासनात नावाजलेले तुकाराम मुंढे यांची आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली अन आरोग्य यंत्रणा टाईट झाली.पदभार घेताच मुंढे यांनी सर्व प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी मूळ पदस्थापनेवर पाठवले. त्यानंतर कोणत्याही कर्मचाऱ्याने जीन्स पॅन्ट अन टी शर्ट घालून कामावर येऊ नये असे आदेश काढले.त्यामुळे ते चांगलेच वादग्रस्त ठरले.

दरम्यान दिवाळीच्या सणामध्ये मुंढे यांनी औरंगाबाद आणि लातूर विभागाचा तीन दिवस दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी जिल्हा रुग्णालयात तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणा सुधारण्याच्या सूचना केल्या.

दरम्यान या दौऱ्यात असताना औरंगाबाद येथे उपसंचालक डॉ गोलाईत यांनी मुंढे यांचे स्वागत केल्याचा फोटो व्हायरल होत आहे.यामध्ये मुंढे हे टी शर्ट अन जीन्स पॅन्ट घातलेले दिसत आहे.

एकीकडे आपल्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना जीन्स,टी शर्ट न घालण्याचे आदेश देणारे आयुक्तच कसकाय या पेहरावात कर्तव्यावर होते?का हा आदेश फक्त अधिकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे ? आयुक्त या आदेशात बसत नाहीत का? असे एक ना अनेक प्रश्न आता चर्चिले जात आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click