December 10, 2022

अंगणवाडी चा आहार रस्त्यावर !

अंगणवाडी चा आहार रस्त्यावर !

बीड- शहरातील अंगणवाडी केंद्रामधून दिला जाणारा पोषण आहार बालेपिर भागात रस्त्यावर टाकून दिल्याचे समोर आले आहे.पोषण आहार वाटप करण्याऐवजी तो परस्पर विक्री करून रिकाम्या पिशव्या या भागात आढळून आल्या.स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली.हा आहार नेमका कोणत्या अंगणवाडी चा होता अन तो वाटप न करता परस्पर विक्री केला की रस्त्यावर फेकून दिला याचा शोध घेण्याची गरज आहे.

राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रामधील लहान बालके,गरोदर,स्तनदा माता यांना प्रत्येक महिन्याला गहू,तांदूळ,मुगडाळ,तिखट,मीठ,साखर असा पोषण आहार दिला जातो.या माध्यमातून या लाभार्थ्यांचे पोषण व्हावे हा उद्देश आहे.

मात्र बहुतांश ठिकाणी हा आहार वाटप न करता परस्पर विक्री केला जातो किंवा गुरांना खाऊ घातला जातो असे अनेकवेळा निदर्शनास आले आहे. असाच एक प्रकार शहरातील बालेपिर आमराई भागात उघडकीस आला आहे.

बालेपिर भागातील एका उकिरड्यावर पोषण आहाराच्या रिकाम्या पिशव्या स्थानिक नागरिकांना आढळून आल्या आहेत.हा आहार कोणत्या अंगणवाडी चा होता की या भागातील शाळेचा होता याची माहिती मिळू शकलेली नाही.

अंगणवाडी केंद्रामधून दिला जाणारा आहारजर अशा प्रकारे रस्त्यावर टाकून दिला जात असेल किंवा परस्पर विक्री केला जात असेल तर शहरी भागाचे काम पाहणाऱ्या यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click