December 10, 2022

जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार वाऱ्यावर !

जिल्हा रुग्णालयाचे औषध भांडार वाऱ्यावर !

बीड- एकीकडे राज्याचे आरोग्य आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बीड जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या खरेदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी उपसंचालक यांचे पथक बीडला पाठवले असताना दुसरीकडे जिल्हा रुग्णालयाचे औषधी भांडार वाऱ्यावर सोडून स्टोर किपर ठाकर आणि चव्हान्हे दोघे दोन दिवसापासून गायब आहेत.एका कंत्राटी शिपायावर हे कार्यालय सोडून हे दोघे गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर डॉ जयश्री बांगर ,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये, तानाजी ठाकर,रियाज यांनी खरेदीमध्ये घोटाळा केला.कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी केल्याचे दाखवून आपले उखळ पांढरे केले.

या प्रकरणी न्यूज अँड व्युजने सातत्याने आवाज उठवला. त्यानंतर मुंबई, लातूर उपसंचालक यांच्या कार्यालयाने या औषध व इतरखरेदीचे ऑडीट केले.मे जून 2022 मध्ये झालेले ऑडीट रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.दरम्यान तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यानंतर या खरेदी घोटाळ्याची तपासणी करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार लातूरच्या उपसंचालक श्रीमती चामले यांचे पथक बीडमध्ये दाखल झाले.हे पथक बीडला दाखल होताच स्टोर किपर तानाजी ठाकर आणि चव्हाण हे दोघेदोन दिवसापासून गायब झाले आहेत.या कार्यालयाचा पदभार एका कंत्राटी शिपायकडे देण्यात आला आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे हे शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचेच काही लाडके कर्मचारी न सांगता गायब झाल्याने त्यांचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click