December 10, 2022

कोविड खरेदीची आजपासून सर्जरी ! उपसंचालक करणार चौकशी !!

कोविड खरेदीची आजपासून सर्जरी ! उपसंचालक करणार चौकशी !!

बीड- जिल्हा रुग्णालयात कोविड काळात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बोगस खरेदीची चौकशी करण्यासाठी लातूरच्या उपसंचालक चामले मॅडम यांचे पथक दाखल झाले आहे.आठ ते दहा जण या घोटाळ्याची चौकशी करणार आहेत.या चौकशीच्या माध्यमातून कोविड काळातील खरेदीची सर्जरी होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये,ठाकर,रियाज यांनी कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी केली.याबाबत न्यूज अँड व्युज ने सातत्याने पाठपुरावा केला.त्याची दखल घेत तत्कालीन आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली.

आरोग्य विभागाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी बीडला भेट दिली.त्यानंतर कोविड काळातील खरेदीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.त्यानंतर आरोग्य विभागाचे लातूर उपसंचालक श्रीमती चामले,डॉ ढगे तसेच लातूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह आठ ते दहा जणांचे पथक बीड जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे.

या पथकाने कोविड काळात झालेली खरेदी,त्याची बिले,पुरवठा झालेले साहित्य याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दोषी असणाऱ्या लोकांवर या चौकशी नंतर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click