December 10, 2022

मुंढे यांनी काढले आरोग्य विभागाचे वाभाडे !

मुंढे यांनी काढले आरोग्य विभागाचे वाभाडे !

बीड- आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे बीडच्या जिल्हा रुग्णालयात आले अन तेथील रुग्णसेवेची अनास्था पाहून संतापले.सरकारी नोकरीत असताना खाजगी प्रॅक्टिस कराल तर डिसमिस करेल असा सज्जड दम भरत त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंढे यांच्या या दौऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे कसे तीनतेरा वाजले आहेत हे समोर आले.

तुकाराम मुंढे यांनी दोन दिवस मराठवाड्याचा दौरा केला.बुधवारी बीडला आल्यानंतर ते थेट जिल्हा रुग्णालयात पोहचले.त्या ठिकाणी आयसीयू सह काही कक्षात त्यांनी भेट दिली.त्यावेळी बाहेरून सिटी स्कॅन सह इतर रिपोर्ट रुग्णांनी आणल्याचे पाहून ते संतापले.

आता प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर थेट डिसमिस करणार, असं म्हणत मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ही लास्ट वार्निंग आहे असं म्हणत मुंढे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला. मुंढे यांच्या या इशाऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तालुका वैद्यकीय अधिकारी हे खाजगी प्रॅक्टिस करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर मुंढे यांनी येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते, यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

बीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.

त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये. जर केल्यास डीसमिस करू. असा सज्जड दम देखील यावेळी मुंडे यांनी भरला आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click