December 10, 2022

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गहू तांदूळ वाटप रखडले !!

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील गहू तांदूळ वाटप रखडले !!

बीड- शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील लोकांना स्वस्तात पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे वाटप गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बंद असल्याने बीपीएल धारक हैराण झाले आहेत.अन्न व नागरी पुरवठा विभागाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील दारिद्र्य रेषेवरील आणि केशरी कार्डधारक शेतकऱ्यांना दोन रुपये किलो गहू, तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना आणली होती. एकूण पाच किलो धान्य दिले जायचे. काही जिल्ह्यांमध्ये ते प्रमाण तीन-दोन वा चार-एक असे होते. बहुतेक ठिकाणी चार किलो गहू दिले जात होते. महाविकास आघाडी सरकारमध्येही योजना कायम होती. त्यासाठीच्या धान्याची खरेदी ही राष्ट्रीय अन्न महामंडळाकडून (एफसीआय) केली जात होती.

मात्र, महाविकास आघाडी सरकार जाण्याच्या काहीच दिवस आधी एफसीआयकडून धान्य खरेदी न करता ती खासगी पुरवठादाराकडून खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एफसीआयने गहू पुरवठ्याबाबत असमर्थता दर्शविल्याने हा निर्णय घ्यावा लागला होता. एफसीआयचा पुरवठा बंद झाल्यानंतर आता पाच महिन्यांपासून केवळ एक वा काही ठिकाणी दोन किलो तांदूळ तेवढा पुरवला जात आहे.

या योजनेतील लाभार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे.औरंगाबाद ३५८०९१, जालना १४३०१२, नांदेड ३८४८६२, बीड ५५३५२६, उस्मानाबाद २५०८८१, परभणी २५३७८४, लातूर २९९९३६, हिंगोली १६१५२५, अमरावती ५०३४९९, वाशिम ९९७१३, अकोला १९२५५४, बुलडाणा ३७२०२३, यवतमाळ ३५८९९६, वर्धा ५६७८१.


गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टी आणि त्यातून झालेल्या पीकहानीमुळे शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे भीषण वास्तव समोर आलेले असताना दुसरीकडे सरकारने मदतीचा हात आखडता घेतला आहे. खासगी पुरवठादाराकडून गहू खरेदी करून पुरवठा पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या प्रक्रियेला गती न दिल्याने खरेदी रेंगाळली असल्याचे चित्र आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click