December 10, 2022

धनंजय मुंडे कडून आनंदाचा शिधा मोफत !

धनंजय मुंडे कडून आनंदाचा शिधा मोफत !

परळी – मागील 2 वर्ष कोविड मध्ये गेल्यानंतर यावर्षी दिवाळी सणानिमित्त एकीकडे उत्साह आहे मात्र अतिवृष्टीने शेतकरी-कष्टकरी वर्ग हैराण आहे, महागाईने सामान्य माणूस हैराण आहे. त्यात आलेल्या दिवाळी निमित्त माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी परळीकरांना एक आगळे वेगळे दिवाळी गिफ्ट मोफत उपलब्ध करून दिले आहे.

धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारने रेशन कार्ड धारक लाभार्थींना जो 100 रुपयात ‘आनंदाचा शिधा’ देऊ केला आहे, परळी शहरातील सर्व रेशन दुकानातील त्या शिध्यापोटी लागणारे प्रतिकीट 100 रुपये हे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या मार्फत प्रशासनास भरले असून, या सर्व किट संबंधित रेशन कार्ड धारकांना मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.

परळी शहरातील सुमारे 36 रेशन दुकानातून या किटसाठी 10 हजार 532 लाभार्थी असून या सर्वांना ही किट धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून 100 रुपयांऐवजी आता मोफत मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतः काही दुकानांमध्ये जाऊन या किट स्वस्त धान्य दुकानदारांकरवी मोफत वितरित केल्या. तसेच शहरारील अन्य लाभार्थींनाही या किट मोफत वितरित करण्याबाबत सूचना केल्या.

अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट 100 रुपयात उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, त्यापुढे जाऊन धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठाण मार्फत वरील दोनही योजनेतील सर्व 10 हजार 532 लाभार्थींच्या किटसाठी लागणारी रक्कम अदा करून संबंधितांना या किट मोफत उपलब्ध करून दिल्याने लाभदारक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. आर्थिक दुर्बल कुटुंबातील अनेकांनी धनंजय मुंडे यांचे याबद्दल आभार मानले आहेत.

धनंजय मुंडे यांनी परळी शहरातील वडसावित्री नगर, माणिक नगर, गुरुकृपा नगर, भोई गल्ली तळ आणि राणी लक्ष्मीबाई टॉवर या 5 भागातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन किटचे प्रातिनिधिक स्वरूपात मोफत वितरण केले तसेच शहरातील अन्य दुकानांमधूनही या सर्व किटचे मोफत वितरण संबंधित लाभार्थींना सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click