December 10, 2022

मेटेंच्या आई,पत्नीकडून गोरगरिबांना आधार !

मेटेंच्या आई,पत्नीकडून गोरगरिबांना आधार !

बीड – स्व. विनायकराव मेटे यांना अभीप्रेत दिवाळी सण साजरा करण्यासाठी आज मेटे कुटुंबीयांनी गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी सकाळ पासून बीड शहर व आसपासच्या परिसरातील बार्शी नाका, ढोले वस्ती, नरसोबा नगर, धानोरा रोड, जिव्हाळा निराधार भवन , भाजी मंडई, स्नेहसावली बालक आश्रम, जिरेवाडी, कामधेनु वृद्धाश्रम, कोळवाडी या सह विविध ठिकाणी स्व.विनायकराव मेटे यांच्या आई, पत्नी डॉ.ज्योती ताई विनायकराव मेटे आणि बंधू रामहरी मेटे यांनी गोरगरिबांना फराळ वाटप करत त्यांना आधार देण्याचे काम केले.

या प्रसंगी शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कोलंगडे, जिल्हा अध्यक्ष नारायणराव काशीद, सी.ए. बी.बी.जाधव, अनिल घुमरे पाटील, सुहास पाटील ,बबनराव शिंदे , अनिताताई शिंदे, संजय पवार आदी सह महिला, शिवसंग्रामचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.विनायकराव मेटे यांचे दुःखद निधन होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे . स्व. विनायकराव मेटे साहेब यांनी नेहमीच राजकारणा पेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले. विविध सामाजिक उपक्रम ते राबवत आले होते. दर वर्षी ते दिवाळी सण आपल्या कुटुंबीय सोबत उत्साहात साजरा करत असत पण त्याच बरोबर समाजातील उपेक्षित, कष्टकरी, कामगार , गोरगरिबांची दिवाळी देखील उत्साहात साजरी व्हावी या साठी ते दिवाळी सणा निमित्त मुंबईतील गरजू लोकांना दिवाळीत फराळ, कपडे आणि इतर गरजेच्या वस्तूंचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करायचे परंतु त्यांच्या अकाली निधनाने मेटे कुटुंबीय , शिवसांग्रम परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणारे विविध वर्गातील, क्षेत्रातील चाहते पोरके झाले आहेत.

दिवाळी सण तोंडावर आहे. यंदा विनायकराव मेटे हयात नसल्याने मेटे कुटुंबीय दिवाळी साजरी करणार नाहीत. पण त्यांच्या पश्चात त्यांनी हाती घेतलेल्या सामाजिक वसा पुढे चालू ठेवत आपण जरी दिवाळी सण साजरा करणार नसलो तरी स्व. मेटे साहेबांना अभीप्रेत दिवाळी सण साजरा करण्यासाठी आज मेटे कुटुंबीयांनी गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फराळ वाटपाचे आयोजन केले होते. या मागचा हेतू फक्त साहेबांना अपेक्षित गरजूंना मदत करणे येवढाच होता असे सांगण्यात आले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click