December 10, 2022

राजयोग अन रोटरी मुळे हजारो वंचितांची दिवाळी गोड !!

राजयोग अन रोटरी मुळे हजारो वंचितांची दिवाळी गोड !!

बीड – आपण समाजाचे काहितरी देणं लागतो या उद्देशाने गेल्या सहा वर्षापासून गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा राजयोग फाउंडेशन,रोटरी क्लब बीड मिडटाऊन यांच्या वतीने यावर्षी तब्बल तीन हजार कुटुंबांना दिवाळी फराळ चे वाटप करण्यात आले. दिलीप धुत आणि त्यांचे चिरंजीव शुभम धुत यांच्या या उपक्रमामुळे गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते.या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी हभप महादेव महाराज चाकरवाडीकर हे आवर्जून उपस्थित होते.

ही भूमी क्रांतिकारकांची, थोर संतमहंत,विभूतींची. त्यामुळेच इतरांचे दुःख आपले मानून आपल्या झोळीतील आनंद त्यांच्या झोळीत टाकून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न धूत परिवारासारखे पुढाकार घेऊन करतात. राजयोग फाउंडेशन आणि रोटरी क्लबने मागील सहा वर्षापासून वंचित, उपेक्षित, पीडित कुटुंबियांची दिवाळी सातत्याने अशा स्तुत्य उपक्रमातून गोड केली .हे काम सोपे नाही. अशा कामातून निश्चितच मोक्ष प्राप्त होतो असे आशीर्वचन ह भ प महादेव महाराज चाकरवाडीकर यांनी आपल्या मनोगततून व्यक्त केले.


राजयोग फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बीड मिड टाउन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता गोरगरिबांची दिवाळी फराळ वाटप करून गोड केली. बीड शहरच नव्हे तर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि तब्बल १२ विविध आश्रमातील बेघर कुटुंबीयांसह वंचित उपेक्षित पीडित दिव्यांग अशा सुमारे ३००० पेक्षा कुटुंबांना दिवाळी फराळ सह सुगंधी तेल, उठणे, साबण आदी दर्जेदार वस्तूंची किट मान्यवरांच्या शुभहस्ते वाटप करून गोरगरिबांची दिवाळी गोड केली.


या स्तुत्य कार्यक्रमाचा शुभारंभ महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी राजयोग फाऊंडेशन चे संस्थापक दिलीप धुत यांच्यासह व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक, बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र सानप, उपनिरीक्षक घनश्याम अंतराम, रामेश्वर मते महाराज, रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाउनचे अध्यक्ष सुनील पारख, सचिव बालाजी घरत, हरिष मोटवाणी, सुर्यकांत महाजन, दिनेश लोळगे, पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक शुभम धूत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ह भ प विक्रम सारूक म्हणाले, आनंद सुख हे इतरांना दिल्यावर वाढते.दीनदुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वरी सेवा आहे आणि ही ईश्वरी सेवा राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून दिलीप धूत यांचा परिवार करत आहे. ही बाब निश्चितच अभिनंदन आहे.रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील पारख म्हणाले, गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प या माध्यमातून पूर्ण होत आहे. याचे सातत्याने समाधान मिळते. हे समाधान इतर कोणत्याही संपत्तीतून मिळणे शक्य नाही.
याप्रसंगी सूर्यकांत महाजन म्हणाले, नगरसेवक शुभम धूत आणि त्यांची टीम गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी त्यासाठी अनेक दिवसापासून 24 – 24 तास परिश्रम घेतात. म्हणूनच हा उपक्रम दरवर्षी आपली उंची वाढवत आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 15000 व्यक्तींची दिवाळी गोड झाल्याने या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


देणाऱ्यांचे हात जोपर्यंत तोपर्यंत उपाशी कोणीही राहणार नाही – शुभम धूत
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, देणारे हात जोपर्यंत आहेत तोपर्यंत कोणीही उपाशी राहणार नाही. हाच विचार समोर ठेवून राजयोग फाउंडेशनच्या माध्यमातून मागील सहा वर्षापासून सातत्याने गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न सन 2017 पासून सुरू केला. पहिल्या वर्षी 1000 गोरगरीब गरजूवंत कुटुंबीयांची दिवाळी गोड केली. यातून जो आनंद मिळाला तो आनंद आयुष्यातील सर्वोच्च ठरला. तेव्हापासून दरवर्षी हा उपक्रम राबवण्याचा संकल्प राजयोग फाउंडेशनचे संस्थापक दिलीप धूत यांच्या संकल्पनेतून राबवण्याचा निर्धार केला असे मत शुभम धुत यांनी व्यक्त केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click