December 10, 2022

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी !

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी !

बीड- 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे शिवबंधन बांधणारे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.सेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यानंतर ते 2019 ची विधानसभा निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर लढले.त्यांचा पुतण्या संदिप क्षीरसागर यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर क्षीरसागर हे शिवसेनेत सक्रिय होते.

मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांनी गेल्या चार महिन्यात आपली भूमिका जाहीर केली नाही.गेल्या चार महिन्यात एकदाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नाही,कोणत्याही कार्यक्रमात ते सहभागी झाले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच बीड नगर पालिकेच्या विविध विकास कामाचे उद्घाटन झाले,हा कार्यक्रम जयदत्त क्षीरसागर यांनी घेतला. त्यामुळे त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती पाटील आणि जगताप यांनी दिली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click