December 10, 2022

पालकमंत्री अतुल सावे करणार अतिवृष्टी पाहणी !

पालकमंत्री अतुल सावे करणार अतिवृष्टी पाहणी !

बीड- राज्याचे सहकार मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे उद्या 22 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहेत.तसेच शिरूर तालुक्यातील रायमोह येथे पुरात वाहून गेलेल्या मृतांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या पंधरा वीस दिवसापासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.सोयाबीन, कापूस यासह अनेक पीक उध्वस्त झाल्याने शेतकरी कोलमडून पडला आहे.शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे 22 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात पाहणीसाठी येणार आहेत.सावे हे गेवराई तालुक्यातील खांडवी येथे तसेच बीड तालुक्यातील काही भागात भेटी देणार आहेत.त्यानंतर पालकमंत्री सावे हे रायमोह येथे गुरुवारी घडलेल्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना भेट देणार आहेत.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click