December 10, 2022

तुकाराम मुंढे जिल्ह्याच्या दौऱ्यावर ! आरोग्य विभागाचा घेणार आढावा !!

तुकाराम मुंढे जिल्ह्याच्या दौऱ्यावर ! आरोग्य विभागाचा घेणार आढावा !!

बीड- राज्याच्या आरोग्य विभागाची सूत्र हाती घेतल्यानंतर आपल्या निर्णयामुळे चर्चेत आलेले आयुक्त तुकाराम मुंढे हे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.दोन दिवसांच्या दौऱ्यात मुंढे हे वेगवेगळ्या रुग्णालयांना भेटी देऊन आरोग्य यंत्रणेचा आढावा घेणार आहेत.त्यामुळे कामचुकार आरोग्य कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होणार हे नक्की.

जिल्हाधिकारी असो की विभागीय आयुक्त अथवा आरोग्य विभागाचे आयुक्त नेहमीच आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत असणारे तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाचा पदभार घेतल्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सुधारण्यावर भर दिला आहे.

आरोग्य विभागाची सूत्र घेतल्यानंतर त्यांनी सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले.यामध्ये रात्री अकरा ते पहाटे सातवाजेपर्यंत किमान एक वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी असावा अन्यथा कारवाई करण्याचे आदेश दिले.

दरम्यान आता तुकाराम मुंढे हे 25 आणि 26 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.त्यांच्या या दौऱ्यात ते शासकीय रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील रुग्णालयात जाऊन तपासणी करणार आहेत.24 रोजी दिवाळी सुरू होत असून 22 पासून सर्व कर्मचारी सुट्टीवर असणार आहेत.मात्र आता मुंढे यांचा दौरा आल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click