December 10, 2022

मुंडेंच्या जिल्ह्यातच ऊसतोड कामगारांचे वसतिगृह सुरू होईना !!समाजकल्याण विभागाचा भोंगळ कारभार !!

मुंडेंच्या जिल्ह्यातच ऊसतोड कामगारांचे वसतिगृह सुरू होईना !!समाजकल्याण विभागाचा भोंगळ कारभार !!

बीड- ज्या गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोड कामगारांसाठी हयात घालवली त्यांच्याच जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मंजूर असलेले वसतिगृह न सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा समाजकल्याण कार्यालयाच्या भोंगळ कारभाराचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे.विशेष म्हणजे ज्या तत्कालीन समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी या वस्तीगृहासाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्याच जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार सुरू आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीडचे पालकमंत्री तथा तत्कालीन समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यभरातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. वस्तीगृहासाठी भाड्याने इमारती,साहित्य ,भोजनाचे ठेकेदार यांची निवड करण्यास देखील मंजुरी देण्यात आली.

विशेष म्हणजे यासाठीचा निधीदेखील त्या त्या जिल्ह्याकडे वर्ग करण्यात आला.मात्र समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे बीड जिल्ह्यात अद्याप एकही वस्तीगृह सुरू झालेले नाही.

स्व गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता कायमचा निघून जावा यासाठी चाळीस पन्नास वर्षे संघर्ष केला त्यानंतर पंकजा मुंडे असोत की धनंजय मुंडे यांनी देखील ऊसतोड कामगार महामंडळ असो की हंगामी वसतिगृह अथवा कायमस्वरूपी वसतिगृह यासाठी विशेष प्रयत्न केले. मात्र शासकीय पातळीवर कितीही निर्णय झाले तरी प्रशासनातील अधिकारी यांच्या मनात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कोणतीच योजना सुरू होऊ शकत नाही,याचा अनुभव या योजनेतून सुद्धा येत आहे.

बीड जिल्ह्यात बारा वस्तीगृहासाठी इमारती भाड्याने घेण्यात आल्या आहेत.मात्र दिवाळी आली तरीदेखील एकही वसतिगृह सुरू झालेले नाही.त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या निवासाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click