December 10, 2022

अनुरथ सानप यांना धक्काबुक्की !

अनुरथ सानप यांना धक्काबुक्की !

बीड- पाटोदा तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते तथा संस्थाचालक अनुरथ सानप यांना भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संघर्ष योद्धा कार्यालयात महिलांकडून धक्काबुक्की झाल्याने खळबळ उडाली आहे. माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या जनता दरबार नंतर हा प्रकार घडला.

भाजपच्या माजीमंत्री पंकजा मुंडे या बुधवारी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या.जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या कार्यालयात त्यांनी भेटायला आलेल्या लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या.

त्या बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे जेष्ठ नेते अनुरथ सानप यांना काही महिलांनी घेराव घातला. सानप यांच्या संस्थेमधील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यापासून पगार नसल्याने त्यांच्या घरच्या महिला,तसेच काही कर्मचारी महिला या सानप यांच्या भेटीसाठी आल्या होत्या.

यावेळी या महिला सानप यांच्याशी बोलत असताना शाब्दिक चकमक झाली अन त्यानंतर या महिलांनी सानप यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला.या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांत खळबळ उडाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click