December 10, 2022

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटनासाठी नगर पालिकेने चालू कामे बंद केली !

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटनासाठी नगर पालिकेने चालू कामे बंद केली !

बीड- नगरोथान योजने अंतर्गत महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आलेली शहरातील तब्बल 12 रस्त्यांची कामे नगर पालिकेने बंद केली आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सदरील कामाचे उदघाटन होणार असल्याने ही कामे करू नयेत असे आदेश नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी दिली आहेत.सुरू असलेली कामे बंद करण्याचा हा नगर पालिकेचा निर्णय तुघलकी असून तात्काळ कामे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक आ संदिप क्षीरसागर यांनी दिला आहे.

बीड शहरातील अंबिका चौक ते अर्जुन नगर रस्ता,राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कुल रस्ता,राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा सिमेंट रस्ता व नाली बांधकाम,बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल सिमेंट रस्ता व नाली,कासट ते शहर पोलीस स्टेशन रस्ता,मसरत नगर ते नेत्रधाम-सावरकर चौक रस्ता,शीतल वस्त्र भंडार दोन्ही बाजूचे रस्ते,पेठबीड पोलीस स्टेशन-ईदगाह-नाळवंडी नाका रस्ता,नाळवंडी नाका-पाण्याची टाकी रस्ता,बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा रस्ता,बार्शी रोड मुक्ता लॉन्स-तक्कीया मज्जिद ही कामे 20 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आ संदिप क्षीरसागर यांनी सुरू केली.

ही कामे सुरू होण्यापूर्वी नगर पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि नगर पालिका पाणी पुरवठा विभाग यांच्याकडून अहवाल मागवला होता.या दोन्ही कार्यालयांनी ना हरकत दिल्यानंतर ही कामे सुरू झाली.

मात्र अचानक ही कामे बंद करण्याचे आदेश नगर पालिकेने दिले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार असल्याने तूर्तास ही कामे करू नयेत असे पत्र मुख्याधिकारी यांनी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

याबाबत आ संदिप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कामे तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click