December 10, 2022

हताश अन निराश शेतकऱ्याला आधार द्या – पंकजा मुंडे !

हताश अन निराश शेतकऱ्याला आधार द्या – पंकजा मुंडे !

बीड- शेतकरी हताश अन निराश आहे,परतीच्या पावसानं होत्याच नव्हतं झालं आहे,त्यामुळे सरसकट पंचनामे करून बळीराजाला तातडीने आधार द्यावा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव,माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

परतीच्या पावसाने बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतीच नुकसान झाले आहे. सोयाबीन,कापूस यासह इतर पिके अजूनही पाण्यातच आहेत.बी बियाणासाठी केलेला खर्च देखील निघणे अशक्य आहे.

बीड जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी पाटोदा मांजरसुम्बा भागातील जाधववाडी शिवारात थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

बीड जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे, पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळाले. अशा संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आज मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील जाधववाडी शिवारात शेतात जाऊन पिकांची पाहणी केली.

शेतकरी हताश आणि निराश आहे. अशा संकटात त्याला आधार दिला गेला पाहिजे. नुकसान मोठे आहे, सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच, विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावे, पालकमंत्री यांनी लक्ष घालावे असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click