December 10, 2022

नुकसानभरपाई मिळणार,काळजी नको ! केंद्रेकर पोहचले थेट बांधावर !!

नुकसानभरपाई मिळणार,काळजी नको ! केंद्रेकर पोहचले थेट बांधावर !!

बीड- कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या तोडणीनंतर चार पैसे हातात येतील अन दिवाळी जोरात साजरी होईल या बळीराजाच्या आशेवर सततच्या पावसाने पाणी फेरलं अन बळीराजा कोलमडून पडला.या शेतकऱ्याला थेट बांधावर जात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आधार दिला.नुकसानभरपाई निश्चित मिळेल,काळजी करू नका अस म्हणत केंद्रेकर यांनी गेवराई, बीड,धारूर ,माजलगाव या भागातील शेतकऱ्यांना आधार दिला.

औरंगाबाद चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत गेवराईत रस्त्यावरील काही शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले, त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकर्‍यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे उपस्थित शेतकर्‍यांना केंद्रेकरांनी आश्वासीत केले

बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडून शेतातील पिके उद्ध्वस्त करून टाकले. रडकुंडीला आलेल्या शेतकर्‍यांना शासन-प्रशासन दरबारातून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. शेतकर्‍यात शासन-प्रशासनाविरुद्ध संताप असतानाच आज आयुक्त सुनील केंद्रेकर हे शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात डेरेदाखल झाले.

औरंगाबादहून येताना त्यांनी गेवराईत पाहणी केली. रस्त्यावरून जाताना अचानक एका ठिकाणी गाडी थांबविली आणि थेट ते कापसाच्या पिकात डेरेदाखल झाले.त्यानंतर केंद्रेकर यांनी बीड, माजलगाव आणि धारूर या तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत पाहणी केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click