December 10, 2022

आज उद्या दिवाळी किटचे वाटप होणार – चव्हाण !

आज उद्या दिवाळी किटचे वाटप होणार – चव्हाण !

मुंबई – सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य सरकारने साखर, रवा, चणाडाळ आणि एक लिटर पामतेल 100 रुपयांत देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार हा शिधासंच (दिवाळी किट) 19 आणि 20 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येईल आणि त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचविण्याच्या दृष्टीने विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वांची दिवाळी गोड व्हावी, हेच आमचे ध्येय आहे. 19 आणि 20 ऑक्टोंबरपर्यंत या चारही वस्तू जिल्हापातळीवर सर्व रेशनिंग दुकानांवर पोहचविण्यात येतील. त्यानंतर या वस्तूंचे वाटप करण्यात येईल, असे चव्हाण म्हणाले.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 25 लाख, प्राधान्य कुटुंबातील 1.37 कोटी, औरंगाबाद आणि अमरावती विभागांतील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या चौदा जिल्ह्यांतील एपीएलमधील (केशरी) सुमारे 9 लाख शिधापत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका 1 किट वितरित करण्यात येणार आहे. असे एकूण 1 कोटी 71 लाख एवढ्या शिधापत्रिकाधारकांना हे दिवाळी किट वितरित करण्यात येणार आहे. हे दिवाळी किट पात्र शिधापत्रिकाधारकांना ई- पॉस प्रणालीद्वारे 100 रुपये या सवलत दराने वितरित करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील गोरगरिबांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने शिंदे फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय अतिशय पारदर्शक आहे. त्या दृष्टीने निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात आली. 9 निविदा प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 6 कंपन्या पात्र ठरल्या, त्यापैकी 5 कंपन्यांनी सहभाग घेतला. या निविदांमध्ये सर्वात कमी दर 279 रुपये असलेल्या महाराष्ट्र स्टेट को. ऑ. कन्झ्युमर फेडरेशन लिमिटेड, मुंबईया संस्थेला हे काम देण्यात आले, असेही रवींद्र चव्हाण यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click