December 10, 2022

कोलमडून पडलेला बळीराजा एकत्र आला अन अमरसिंह पंडितांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला !!

कोलमडून पडलेला बळीराजा एकत्र आला अन अमरसिंह पंडितांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला !!

गेवराई- दिवाळी आली तरीदेखील पावसाने उघडीप न दिल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे.त्यामुळे शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी होत आहे.याबाबत प्रशासनाकडे गाऱ्हाणे मांडण्यासाठी माजी आ अमरसिंह पंडित यांच्या भेटीला आलेल्या शेकडो शेतकऱ्यांना घेऊन पंडितांनी थेट तहसील कार्यालय गाठले.कोणतीही पूर्वसूचना नाही,बॅनरबाजी नाही मात्र तरीही शेकडो शेतकरी एकत्र आले ही घटना ओल्या दुष्काळाची तीव्रता दाखवून द्यायला पुरेशी आहे.

सततच्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरीपाच्या पिकाचे पूर्ण नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी शेतजमीनी खरडून वाहून गेल्या आहेत. कापसा सारख्या पिकाला बाजारपेठेत चांगले दर मिळत असताना शेतात अतिवृष्टीमुळे कापूस वाहून चाललेला पहावा लागत आहे. शेतीचे हे चित्र भयावह असताना शासन व्यवस्था मात्र निर्ढावलेली दिसत आहे. पर्जन्यमानाची आकडेवारी सुध्दा अचूकपणे मांडली जात नाही. पिक विमा कंपन्या आणि शासन यांच्यामधील संगणमतामुळे विमाधारक शेतकऱ्यांना अग्रीम मिळाला नाही. एैन नुकसानीच्या सूचना देताना पिक विमा कंपनीची वेबसाईट बंद असते, अशिक्षित शेतकरी कंपनीच्या जाचक अटीमुळे नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहे. शासन आणि प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्विकारत असल्याचा आरोप करून शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचा अंत न पाहता तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करून दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित यांनी केली.

गेवराई शहरातील मुख्य रस्त्यावरून माजी आमदार अमरसिंह पंडित शेकडो पदाधिकाऱ्यांसह शासनविरोधी घोषणा देत तहसिल कार्यालयावर धडकले. तहसिलदार सचिन खाडे आणि तालुका कृषी अधिकारी अभय वरकुटे यांच्याशी त्यांनी या बाबत तहसिल कार्यालयात सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने तहसिलदारांच्या मार्फत सविस्तर लेखी निवेदन यावेळी त्यांनी दिले.

याप्रसंगी अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनाही गावा-गावात विमाधारक शेतकऱ्यांचे फॉर्म भरणे, ऑनलाईन तक्रारी दाखल करणे, नुकसानीचे फोटो काढणे यांसह इतर कामांच्या जबाबदाऱ्या देवून वेळप्रसंगी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी ठणकावून सांगितले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click