December 10, 2022

खाजगी बसमधून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण !

खाजगी बसमधून प्रवास म्हणजे मृत्यूला आमंत्रण !

बीड- नाशिक येथे झालेल्या बस जळीत घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या परिवहन विभागाने सर्वच खाजगी बसची तपासणी सुरू केली आहे.विशेष म्हणजे या तपासणीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.राज्याच्या रस्त्यावर शेकडो बसेस या धोकादायक अवस्थेत प्रवासी वाहतूक करत असल्याचे यामध्ये उघड झाले आहे.

आतापर्यंत १ हजार १८१ बसमध्ये वाहतूक नियमांचे पालनच होत नसल्याचे आढळले आहे. यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, अग्निशमन यंत्रणा नसणे, धोकादायकरित्या प्रवाशांची वाहतूक करणे असे प्रकार सर्रास होत असल्याचे समोर आले आहे.

खासगी प्रवासी आराम बस आणि डंपर यांची धडक झाल्यानंतर बसला लागलेल्या भीषण आगीत प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच नाशिक येथे घडली होती. दुर्घटनाग्रस्त बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक होत होती. त्यानंतर शासनाच्या आणि विशेषत: परिवहन विभागाच्या भूमिकेवर टीका झाल्यानंतर राज्यात खासगी प्रवासी बस वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.


त्यानुसार ९ ऑक्टोबरपासून राज्यात कारवाईला सुरुवात झाली असून ४ हजार ५६० बसची तपासणी करण्यात आली. यापैकी १ हजार १८१ बसमध्ये वाहतूक नियमांचे पालन झाले नसल्याचे निदर्शनास आले. दोषी आढळलेल्या या बसपैकी १३९ बस विनापरवाना तसेच परवानाच्या अटींचा भंग करुन चालवल्या जात होत्या. महत्त्वाची बाब म्हणजे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४८ बसवरही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे ४९१ बसवर अग्निशमन यंत्रणाच नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय आपत्कालिन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या बसची संख्या १५१ आहे. एकूण कारवाईतून सात लाखांहून अधिक दंड वसूल झाला आहे. ही कारवाई २३ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click