December 10, 2022

बळीराजाला साथ अन मदतीचा हात द्या – संदिप क्षीरसागर !

बळीराजाला साथ अन मदतीचा हात द्या – संदिप क्षीरसागर !

बीड- यावर्षी शेतकऱ्यांवर भयंकर संकट आले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याचे चित्र असून जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.  गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बीड विधानसभा क्षेत्रासह जिल्हाभरात अतिवृष्टी होऊन काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन व कापसासह सर्वच पीकांचे संपूर्ण नुकसान झाले असल्याने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी शासनाकडे केली आहे.

ऐन पेरणीच्या काळात पावसाचे प्रमाण कमी झाले, त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरूवातीला सर्वदूर जोरदार पाऊस झाला मात्र या दरम्यान पेरणी झालेल्या प्रमुख पिकांपैकी सोयाबीनसह इतर पिकांवर गोगलगायींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला. यानंतर सलग ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी कमी झाली आणि ऐन उभारणीत पिकांचे नुकसान झाले. पीक विम्याच्या बाबतीत खाजगी विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नुकसान झालेल्यांपैकी अनेक मंडळांना भरपाई मिळू शकलेली नाही.

दरम्यान ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. बीड विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. पिकांवर सातत्याने आलेल्या संकटानंतर ऐन काढणीच्या वेळीच अक्षरशः कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती झाल्याचे चित्र आहे. सर्व पिकाचे संपुर्णत: नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना, हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाताना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालकमंत्री, मुख्य सचिव, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त यांच्याकडे पत्रांद्वारे केली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click