December 10, 2022

माधव भंडारी यांच्या गाडीला अपघात !

माधव भंडारी यांच्या गाडीला अपघात !

बीड- बीड येथील कार्यक्रम आटोपून अंबाजोगाई कडे निघालेले भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी आणि राम कुलकर्णी यांच्या गाडीला रिक्षाने धडक दिल्याने अपघात झाला.सुदैवाने यात दोघेही सुखरूप आहेत.

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे बीड येथे एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आले होते.बीडचा कार्यक्रम संपल्यानंतर राम कुलकर्णी यांच्यासोबत ते अंबाजोगाई कडे निघाले होते.केज तालुक्यातील मस्साजोग येथे भंडारी यांच्या गाडीला रिक्षाने धडक दिली.

या अपघातात गाडीचे नुकसान झाले मात्र सुदैवाने भंडारी आणि कुलकर्णी हे दोघेही सुखरूप आहेत.या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click