December 10, 2022

दिवाळीत एसटी कापणार खिसा !

दिवाळीत एसटी कापणार खिसा !

बीड- दिवाळीच्या सुटयात गावाकडे जाणाऱ्या चाकरमानी तसेच विद्यार्थी,पालकांसाठी एसटी महामंडळाने केलेली भाववाढ डोकेदुखी ठरणार आहे.31 ऑक्टोबर पर्यंत एसटीच्या भाड्यात वाढ केल्याने सर्वसामान्य माणसाचा खिसा कापला जाणार आहे.

दिवाळीच्या काळात तिकीटांचे दर 10 टक्कांनी महागणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ असणार आहे. दिवाळीच्या तोंडावर चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहे. सुट्टी टाकून चाकरमानी गावाकडे जाण्याची तयारी करत आहे. मात्र, लालपरी अर्थात एसटी बसच्या तिकीटांमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.एसटी महामंडळाचे महसूल तोट्यात असल्यामुळे ही भाडेवाढ करण्यात येणार आहे

दिवाळीच्या काळात एसटी बसेसला जास्त गर्दी असते. या गर्दीच्या हंगामामध्ये महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाला दिला आहे.

त्यामुळे 21 तारखेच्या मध्यरात्रीपासून नवी भाडेवाढ लागू होणार आहे. ही भाडेवाढ 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत राहील. नवीन भाडेवाढ ही परिवर्तन, निमआरामी हिरकणी, शिवशाही आणि स्लिपर कोच बसेससाठी लागू असणार आहे.

शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाढ लागू नसणार नाही. ज्या प्रवाशांनी आधीच तिकीटांचे आरक्षण केले असेल तर वाहकाकडून नव्या दरानुसार, तिकीट आकारले जाणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय हा पासधारकांना लागू नसणार आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click