December 10, 2022

टीईटी घोटाळ्याची सुरवात 2018 पासून !

टीईटी घोटाळ्याची सुरवात 2018 पासून !

पुणे- शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी मध्ये 2019 साली झालेला घोटाळा राज्यभर गाजत असताना आता असाच घोटाळा 2018 साली सुद्धा झाल्याचे समोर आले आहे.2018 साली जवळपास 1663 उमेदवारांनी अफरातफर करत बोगस प्रमाणपत्र मिळवल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे टीईटी घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

२०१८मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबाबत पुणे सायबर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या तपासादरम्यान उमेदवारांच्या गुणपत्रिकांची कसून तपासणी केली असता १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ७७९ उमेदवार अपात्र असताना त्यांनी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर ८८४ उमेदवारांनी आरोपींच्या सहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे आढळून आले. या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करून परीक्षा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले.


राज्य परीक्षा परिषदेने २०१९च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर आता २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे.त्यातील ७७९ उमेदवार अपात्र असताना त्यांनी त्यांच्या गुणांमध्ये फेरफार करून स्वतःला उत्तीर्ण केले, तर ८८४ उमेदवारांनी आरोपींच्या सहाय्याने बनावट गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र तयार करून घेतल्याचे आढळून आले. या गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करून परीक्षा परिषदेने संबंधितांवर दंडात्मक कारवाई केल्याचे स्पष्ट करण्यात आले.


राज्य परीक्षा परिषदेने २०१९च्या टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यानंतर आता २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे टीईटीत ९ हजार ५३७ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे आतापर्यंत स्पष्ट झाले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click