December 10, 2022

राजा उदार झाला अन हाती सतरा लाख दिले !

राजा उदार झाला अन हाती सतरा लाख दिले !

बीड- निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाली होती.त्यानुसार शासनाने 755 कोटींचा निधी वितरित केला आहे,यामध्ये बीड जिल्ह्याच्या वाट्याला मात्र केवळ 17 लाख रुपये आल्याने संताप व्यक्त केला जातो आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावरून सरकारला घेरत दिवाळी कशी साजरी करायची असा सवाल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे आज मदत व पुनर्वसन विभागाने ७५५ कोटी रुपयांच्या निधीचे औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी निकषात न बसणाऱ्या परंतु पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज मदतीपोटी राज्य सरकारने 755 कोटी रुपयांची आर्थिक मदत शासन निर्णयाद्वारे घोषित केली आहे. या 9 जिल्ह्यांच्या यादीत बीड जिल्ह्याचाही समावेश आहे, मात्र 755 कोटींपैकी बीड जिल्ह्यातील 160 शेतकरी बाधित असल्याचे दाखवत केवळ 17 लाख रुपयांची मदत बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या शासन निर्णयाद्वारे घोषित करण्यात आली असल्याने धनंजय मुंडे संताप व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यातील शेतकरी सततच्या पावसाने व नुकसानीने त्रस्त आहेत, त्यातच सरकारने कधी निकषांच्या नावाने तर निकषांच्या बाहेर जाऊनही नुकसानच झाले नाही, असा सांगावा करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे, किंबहुना सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांनी दिवाळी कशी साजरी करावी? असा संतप्त सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click