December 10, 2022

पीआयच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी ! सहा तासापासून शोध सुरू !!

पीआयच्या जाचाला कंटाळून कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी ! सहा तासापासून शोध सुरू !!

बीड- बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने वैतागलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने थेट एस पी ठाकूर यांना मेसेज करून आत्महत्या करत असल्याचे सांगितल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सदरील कर्मचाऱ्याचा सहा तासापासून शोध सुरू आहे.

बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे त्यांच्या वागणुकीमुळे अनेकवेळा वादात सापडले आहेत.फिर्याद देणाऱ्या पासून ते सहकारी कर्मचाऱ्यापर्यंत अनेकांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे ते अनेकदा वादात अडकले आहेत.

शहर ठाण्याचे पोलिस कर्मचारी शरद पवार हे सकाळी पोलिस निरीक्षक यांच्याकडे गुन्ह्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले.तेव्हा रवी सानप यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली.दोघात वाद झाला त्यानंतर सानप यांनी त्याबाबत स्टेशन डायरी ला नोंद घेतली.त्यामुळे व्यथित झालेल्या पवार यांनी थेट एसपी नंदकुमार ठाकूर यांनाच मेसेज केला अन आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

एसपी ना पाठवलेला मेसेज सगळीकडे व्हायरल झाला अन एकच खळबळ उडाली. पवार यांच्या शोधासाठी कर्मचारी गेल्या सहा तासापासून कामाला लागले आहेत.

या घटनेबाबत पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता ही घटना सत्य आहे.आपल्याला मेसेज आला असून सदर कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत असे सांगितले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click