December 10, 2022

झेडपीआर मधून सीईओ,एसीईओ यांची उधळपट्टी !!

झेडपीआर मधून सीईओ,एसीईओ यांची उधळपट्टी !!

बीड- जल जीवन मिशन मध्ये महाघोटाळा पाठीशी घालणारे जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांचा नवा उद्योग समोर आला आहे.तब्बल पन्नास लाखाचा झेडपीआर चा निधी बंगल्याच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आला आहे.एवढ्या पैशात नवा बंगला तयार झाला असता मात्र दुरुस्तीवर एवढा खर्च करून या दोघांनी नेमकं काय साधलं अशी चर्चा होत आहे.

बीड जिल्हा परिषद मध्ये प्रशासकीय कारभार फेब्रुवारी2022 मध्ये सुरू झाला अन अधिकाऱ्यांनी दोन्ही हातांनी पैशाची उधळण सुरू केली.जल जीवन मिशन सारख्या महत्वकांक्षी योजनेत आपल्या मर्जीतल्या गुत्तेदारांना दोनशे कोटींची कामे दिल्यामुळे वादात सापडलेले जिल्हा परिषद प्रशासन आता नव्या कुटाण्यामुळे चर्चेत आले आहे.

जिल्हा परिषद ला जिल्हा परिषद स्वनिधी राखीव असतो.यातून किरकोळ दुरुस्तीची कामे केली जातात.सर्वच विभागांना हा निधी वाटप केला जातो.त्यांच्या सूचनांनुसार हा खर्च होतो.शक्यतो जिल्हा परिषद सदस्य किंवा पदाधिकारी हे आपल्या मतदारसंघात हा निधी खर्च करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र फेब्रुवारी 2022 पासून जिल्हा परिषदवर प्रशासक म्हणून सीईओ यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे सीईओ अजित पवार,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांनी मनमानी कारभार सुरू केला आहे.

नगर रोडवर जुन्या पंचायत समितीच्या आवरात असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या शासकीय निवासस्थानाच्या दुरुस्तीवर लाख दोन लाख नव्हे तर तब्बल पन्नास लाखाचा खर्च झेडपीआर मधून करण्यात आला आहे.

बर हा खर्च करताना या अधिकाऱ्यांनी ओपन टेंडर होऊ नये यासाठी दहा लाखाच्या आत वेगवेगळी कामे दाखवून मजूर संस्थांच्या नावावर ही कामे केली.यामध्ये विद्युतीकरण करताना बोगस संस्था दाखवून पैसे उचलले गेले.

पन्नास लाख रुपयात सहा सात खोल्याचा बंगला आजच्या भावानुसार तयार होऊ शकतो.मग या अधिकाऱ्यांनी एवढा पैसा दुरुस्तीवर का खर्च केला.हा खर्च करताना गुत्तेदार आणि स्वतःचे भले तर केले नाही ना.झेडपीआर चा पैसा हा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे उधळणे कितपत योग्य आहे.एकीकडे दोन तीन लाखाच्या शाळा किंवा इमारत दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देताना आढेवेढे घेणारे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी देखील एवढ्या मोठ्या कामाला मंजुरी कशी काय दिली अशी देखील चर्चा होत आहे.

तब्बल पन्नास लाख रुपये स्वतःच्या शासकीय निवासस्थानावर खर्च करणारे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके हे यामुळे वादात सापडले आहेत.कदाचित त्यांच्याकडे चार्ज असताना त्यांनी ही फाईल मंजूर केली असावी,परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एवढ्या मोठ्या बिलास मंजुरी देताना काहीच तपासणी कशी केली नाही,की ते देखील लक्ष्मी दर्शनाचे लाभार्थी आहेत अशी चर्चा होत आहे.याबाबत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click