December 10, 2022

डेपोटेशन रद्द करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई !

डेपोटेशन रद्द करा अन्यथा शिस्तभंगाची कारवाई !

बीड- जिल्हा रुग्णालयाच्या अंतर्गत तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अंतर्गत असणाऱ्या आस्थापनेवरील वर्ग एक ते वर्ग चार च्या सर्व अधिकारी,कर्मचारी यांच्या प्रतिनियुक्ती रद्द कराव्यात अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा आरोग्य उपसंचालक यांनी दिला आहे.यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

राज्यातील आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचे स्थानिक पातळीवर अधिकारी डेपोटेशन करून त्यांना उपकृत करतात असे निदर्शनास आले आहे.याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व इतरांनी केलेल्या तक्रारींमुळे अखेर आरोग्य उपसंचालक लातूर यांनी तातडीने एक पत्र काढले आहे.

यामध्ये लातूर,बीड ,उस्मानाबाद आणि नांदेड च्या जिल्हा शल्य चिकित्सक आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे डेपोटेशन तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.याबाबतचा अहवाल 24 तासात उपसंचालक कार्यालयास सादर करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

या आदेशामुळे बीड जिल्हा रुग्णालयात डेपोटेशन वर असलेले डॉ शहाणे ,केदार सारख्या अधिकाऱ्यांना मूळ जागी जावे लागणार आहे तर जिल्हा आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर अन कर्मचाऱ्यांना देखील मूळ पदस्थापणेवर जावे लागेल.त्यामुळे सीएस अन डीएचओ यांच्या मर्जीतल्या कर्मचाऱ्याची चांगलीच अडचण झाली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click