December 10, 2022

भगीरथ बियाणी यांची आत्महत्या !

भगीरथ बियाणी यांची आत्महत्या !

बीड- भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वतःच्या राहत्या घरी गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आत्महत्ये मागचे नेमके कारण कळू शकले नाही.घटनेची माहिती मिळताच बीडच्या खा प्रीतम मुंडे या फिनिक्स रुग्णालयात दाखल झाल्या आहेत.

पत्रकार,व्यापारी,महसूल,पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे भगीरथ बियाणी हे सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर होते.स्व गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते.

मागील वर्षी त्यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यांना पुढील उपचारासाठी फिनिक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click