December 10, 2022

जनसेवेच व्रत घेतलेल्या शिवाजीराव पंडितांच्या पुढच्या पिढीला साथ द्या – शरद पवार !

जनसेवेच व्रत घेतलेल्या शिवाजीराव पंडितांच्या पुढच्या पिढीला साथ द्या – शरद पवार !

गेवराई- आयुष्यातील चाळीस पंचेचाळीस वर्ष जनसेवेच व्रत हाती घेतलेल्या शिवाजीराव पंडित यांचे तालुक्याच्या विकासात मोठे योगदान आहे.त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांच्या पुढच्या पिढीला साथ द्या ,आम्ही पक्ष म्हणून सोबत आहोत असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते पंडित यांचा सत्कार केला.यावेळी रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे,खा श्रीनिवास पाटील,माजीमंत्री जयंत पाटील,धनंजय मुंडे, मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह मान्यवर हजर होते.

यावेळी बोलताना शरद पवार यांनी पंडित यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतला.पंचायत समिती सदस्य ते आमदार,मंत्री या शिवाजीराव पंडित यांच्या आयुष्यात त्यांनी केवळ विकास अन विकासाचा ध्यास घेतला.जयभवानी कारखाना,शिक्षण संस्था या माध्यमातून त्यांनी जनसेवा केली.राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर पंडित यांनी शेतीत लक्ष घातले.

विजय ला आमदार करा ही माझी शेवटची इच्छा समजा पण मदत करा अस भावनिक आवाहन सत्कारमूर्ती शिवाजीराव पंडित यांनी केले अन उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना समर्थन दिले.

आज शिवाजीराव पंडित हे निवृत्त झाले असले तरी अमरसिंह पंडित,विजयसिंह पंडित हे जनसेवेत आहेत.पुढच्या वेळी त्यांना सहकार्य करा आम्ही पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहोत अस म्हणत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा स्पष्ट केली.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click