December 10, 2022

आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट देण्याचे आदेश !

आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट देण्याचे आदेश !

बीड- राज्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले असताना आता नवनियुक्त आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी रात्री प्राथमिक आरोग्य केंद्र,उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांना सरप्राईज व्हिजिट देण्याचे आदेश दिले आहेत.प्रत्येक ठिकाणी रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत एक वैद्यकीय अधिकारी थांबलाच पाहिजे असे मुंढे यांनी आदेशात म्हटले आहे.त्यानुसार बीडचे सीएस डॉ साबळे आणि डीएचओ डॉ गित्ते यांनी चार केंद्रांना भेटी दिल्या.यात तीन केंद्रांना कुलप असल्याचे दिसून आले.

आपल्या दबंग निर्णयामुळे ज्या विभागात जातील तेथे आपली छाप सोडणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आरोग्य विभागात आयुक्त पदाचा पदभार घेताच आरोग्य यंत्रणा टाईट करण्यास सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा शरपंजरी पडल्याचे वारंवार दिसून आले आहे.प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्याने मुख्यालयी राहण्याचे आदेश असताना एकही डॉक्टर अथवा कर्मचारी थांबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रात्री अकरा ते पहाटे पाच वाजेपर्यंत प्रत्येक पीएचसी मध्ये एक मेडिकल ऑफिसर,एक कर्मचारी हजर असलाच पाहिजे असे मुंडे यांनी म्हटले आहे.

केवळ कागदी आदेश काढून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्येक सीएस आणि डीएचओ यांनी पीएचसी,ग्रामीण रुग्णालय,उपकेंद्र या ठिकाणी सरप्राईज व्हिजिट करावी अन त्याचा अहवाल तात्काळ कार्यालयास पाठवावा असे म्हटले आहे.

मुंडे यांच्या आदेशानुसार बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चराठा आणि नवगण राजुरी तर डीएचओ डॉ अमोल गित्ते यांनी नालवंडी आणि मादलमोही या प्राथमिक आरोग्य केंद्रात सरप्राईज व्हिजिट केली.रात्री पडत्या पावसात डॉ साबळे हे भेटी देण्यासाठी गेले असता दोन्ही पीएचसी ला कुलूप असल्याचे दिसून आले.

आयुक्त मुंडे यांच्या या आदेशाने वैद्यकीय अधिकारी अन कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यालयी न राहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click