December 10, 2022

अजिनाथ मुंडे तडकाफडकी कार्यमुक्त ! डॉ शिंदेंना नोटीस !!

अजिनाथ मुंडे तडकाफडकी कार्यमुक्त ! डॉ शिंदेंना नोटीस !!

बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोप असलेले औषध निर्माता अजिनाथ मुंडे याला नेकनूर येथे प्रतिनियुक्तीवर पदस्थापणा दिल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने प्रकाशित करताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी याबाबत माहिती घेतली.मुंडे याला सीएस यांच्या परस्पर नेकनूर येथे जॉईन करून घेतल्याचे उघड झाले.त्यानंतर डॉ साबळे यांनी तडकाफडकी मुंडे याला कार्यमुक्त करण्याचे आदेश देत नेकनूर चे वैद्यकीय अधीक्षक डॉ शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

अजिनाथ मुंडे याने गणेश बांगर,जयश्री बांगर,राजरतन जायभाये यांच्यासोबत संगनमत करून दोनशे कोटींपेक्षा अधिक चे साहित्य आणि वस्तू पुरवठा केल्याचे कागदोपत्री दाखवून अपहार केल्याचे आरोप होते.तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर मुंडे यांची बदली हदगाव जि नांदेड येथे करण्यात आली होती.

मात्र सत्ता बदल होताच मुंडे याने मंत्रालयातून सूत्र हलवली आणि आरोग्य उपसंचालक लातूर यांच्या कार्यालयातून डेपोटेशन ची ऑर्डर काढली.ही ऑर्डर घेऊन मुंडे थेट नेकनूर च्या रुग्णालयात जॉईन देखील झाला.याबाबत न्यूज अँड व्युज ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केल्यानंतर एकच खळबळ उडाली.

विषेश बाब म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ साबळे यांच्या परवानगीशिवाय मुंडे हा नेकनूर येथे रुजू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉ साबळे यांनी नेकनूर चे वैद्यकीय अधिक्षक डॉ अखिलाश शिंदे यांना विचारणा केली आणि मुंडे याला तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले.

वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता वादग्रस्त कर्मचाऱ्याला रुजू करून घेतल्याप्रकरणी डॉ शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click