December 10, 2022

2024 पर्यंत शांत बसणार – पंकजा मुंडे !

2024 पर्यंत शांत बसणार – पंकजा मुंडे !

बीड- मला आमदार खासदार करा म्हणून मी कोणापुढेही पदर पसरणार नाही,माझी मीडियाला हात जोडून,पाया पडून विनंती आहे की, यापुढे मला डावलले,मी रेसमध्ये अशा बातम्या चालवू नका.2024 पर्यंत मी शांत राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाने परळी विधानसभेचे तिकीट दिले तर लढायचे अस म्हणत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट केली.

पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केले.मी काहीही बोलले की अर्धवट दाखवून माझ्यावर टीका केली जाते.मी गोपीनाथ मुंडे यांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी राजकारणात आले आहे.

2019 ला विधानसभेत माझा पराभव झाला अन त्यानंतर प्रत्येक विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीत माझे नाव मीडियाने घेतले.ज्यांचा विधानसभेत पराभव झाला त्यांना परिषदेत संधी द्यायची नाही हे पक्षाचे धोरण आहे.त्यातूनही काही जणांना संधी दिली गेली मात्र तो पक्षाचा निर्णय आहे.

यापुढे आपण 2024 च्या तयारीचा विचार करत आहोत,त्यामुळे पक्षाने उमेदवारी दिली तर समर्पण काय असत हे दाखवून द्या.मला पदाची लालसा नाही,तुमच्या मनात मी राज्य करते आहे.अस पंकजा मुंडे म्हणाल्या.।

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click