बीड- बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांच्या गोपीनाथ गड ते भगवान भक्ती गड अर्थात सावरगाव या रॅलीला सकाळीच मोठ्या जल्लोषात सुरुवात झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन निघालेल्या खा मुंडे यांचे रस्त्यात जागोजागी उस्फुर्त स्वागत होत आहे.शेकडो वाहनांची ही रॅली सावरगाव येथे पोहचल्यावर पंकजा मुंडे या दसरा मेळाव्याला संबोधित करतील.
आज सकाळी सहा वाजता प्रितम मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली. गोपीनाथ गडावरून निघालेली रॅली सिरसाळा, दिंदृड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी मार्गे नायगाव, तांबवा राजुरी, चुंबळी फाटा, वांजरा फाटा, कुसळंब भगवान भक्तीगड सावरगाव अशी असणार आहे. तर यावेळी मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग रॅलीत पाहायला मिळत आहे.




गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीसाठी निघालेल्या प्रितम मुंडे यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया देतांना म्हंटले आहे की, दरवर्षी आम्ही गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रॅलीला सुरवात करतो आणि कार्यकर्ते तेथून सोबत यायला सुरवात होते. मात्र यावर्षी थेट घरून निघतानाच कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत असल्याने यावर्षी प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळत असल्याचं प्रितम मुंडे म्हणाल्यात.