December 10, 2022

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!

अगोदरच डेपोटेशन त्यात अतिरिक्त चार्ज ! सीईओची कराड यांच्यावर विशेष मेहरबानी!!

बीड- अगोदरच जलजीवन मिशन च्या महाघोटाळ्यामुळे वादात सापडलेले जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी विभागीय आयुक्त यांना विचारात न घेताच प्रतिनियुक्ती करण्याचा सपाटा लावला आहे बीडच्या शिक्षण विभागात तीन-तीन शिक्षण विस्तार अधिकारी असताना केजच्या शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल कराड यांना बीड येथे प्रतिनियुक्ती वर घेत त्यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देऊन जो देता वही हमारा नेता अशी पद्धत राबवली की काय अशी चर्चा होऊ लागली आहे आणि या सगळ्याला शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे देखील समर्थन देत आहेत हे विशेष.


बीड जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सीईओ अजित पवार यांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे एकीकडे आपण फार क्लीन आणि प्रामाणिक असल्याचा आव आणत पवार यांनी अनेक भ्रष्ट कर्मचारी आणि गुत्तेदार यांना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे जल जीवन मिशन असो की स्वच्छ भारत मिशन उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप काकडे यांच्या सांगण्यावरून पवार महाशयांनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले शिवाजी चव्हाण एम आर लाड आनेराव या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना जलजीवन चा लाभ देताना स्वतःचे उखळ देखील पवार यांनी पांढरे करून घेतले एवढ्यावरच पवार थांबले नाहीत तर आता इतर विभागात देखील त्यांनी जो काही गोंधळ घातला आहे तो समोर येत आहे


बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर रिक्त असलेल्या पदावर अधीक्षक पदी प्रतिनियुक्तीवर असलेले केजचे शिक्षण विस्तार अधिकारी हिरालाल कराड यांची नियुक्ती करण्यात आली आहे वास्तविक पाहता बीडच्या शिक्षण विभागात कार्यरत असलेले शिक्षण विस्तार अधिकारी गौतम चोपडे रंगनाथ राऊत आणि राठोड हे तिघे देखील या अतिरिक्त पदभारासाठी पात्र होते मात्र कुंभार यांच्या काळात केजला मूळ पदावर पाठवण्यात आलेल्या कराड यांच्यावर सीईओ पवार यांचा विशेष जीव जडला आणि त्यांना बीडला अधीक्षक वर्ग दोन या पदावर प्रतिनियुक्ती देण्यात आली. एवढे कमी होते की काय म्हणून पवार यांनी आता कराड यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार दिला आहे.


कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करायची असेल तर त्याच्या विभागप्रमुखासह विभागीय आयुक्त यांची देखील परवानगी लागते मराठवाड्यात सुनील केंद्रेकर यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती करू नये असे स्पष्ट म्हटलेले असताना देखील पवार यांनी कराड यांच्यावर विशेष मेहरबानी दाखवली आहे.


आपण फार साधे भोळे आहोत आपल्याला छक्के पंजे जमत नाहीत असे म्हणत तोंडावर पांघरून घेत शिक्षण विभागाचा मलिदा खाण्याचा सपाटा लावलेले शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी हे देखील सीईओ पवार यांच्या होला हो म्हणत अनेक बेकायदेशीर कामे करण्यात व्यस्त आहेत सीईओंनी सांगायचं आणि कुलकर्णींनी त्यांच्या तालावर नाचायचं अशीच परिस्थिती सध्या शिक्षण विभागात दिसून येत आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click