December 10, 2022

वादग्रस्त अजिनाथ मुंडे पुन्हा बीडमध्ये !

वादग्रस्त अजिनाथ मुंडे पुन्हा बीडमध्ये !

बीड- कोरोनाच्या काळात गणेश बांगर,जयश्री बांगर,राजरतन जायभाये यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची उलाढाल करून आपले अन अधिकाऱ्यांचे उखळ पांढरे करणारा औषध निर्माता अजिनाथ मुंडे हा प्रतिनियुक्तीवर पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मुंडेंला सध्या नेकनूर येथे नियुक्ती दिली आहे.

एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असताना बीड जिल्हा रुग्णालयात मात्र काही अधिकारी आणि स्टोर मधील काही कर्मचारी आपले उखळ पांढरे करून घेण्यात व्यस्त होते.

ऑक्सिजन प्लांट पासून ते मास्क पर्यंत अनेक वस्तू आपल्याच फर्म च्या नावावर पुरवठा करून गणेश बांगर,अजिनाथ मुंडे,राजरतन जायभाये, जयश्री बांगर,ठाकर,रियाज यांनी कोट्यवधी रुपये छापले.या प्रकरणात न्यूज अँड व्युज ने वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी कारवाई केल्याचे दाखवले.प्रत्यक्षात फार काही गंभीर कारवाई झालीच नाही.

हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर अजिनाथ मुंडे याने स्वतःची बदली नांदेड जिल्ह्यात हदगाव ग्रामीण रुग्णालयात करून घेतली.मात्र पंधरा वीस दिवसांपूर्वी मुंडे याने आरोग्य उपसंचालक कार्यालयातून डेपोटेशन अर्थात प्रतिनियुक्ती ची ऑर्डर आणली आहे.

बीड जिल्हा रुग्णालयाच्या अंर्तगत असलेल्या नेकनूर स्त्री रुग्णालयात मुंडे यास नियुक्ती देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कोट्यवधी रुपयांचा गडबड घोटाळा केल्यानंतर पुन्हा बीडमध्ये येण्या मागचा मुंडे यांचा नेमका हेतू काय?स्वच्छ प्रशासनाचा डांगोरा पिटणाऱ्या सीएस साबळे यांनी हे कसकाय चालवून घेतले?का ते ही आता या लोकांसोबत प्रवाहात सामील झाले अशी चर्चा होऊ लागली आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click