बीड- शिल्लक सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 1995 साली सत्तेवर आलेल्या युती सरकारच्या काळातच मुख्यमंत्री व्हायचे होते ,उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे लोभी आहेत असा आरोप माजीमंत्री सुरेश नवले यांनी केला.
बीड येथे निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत नवले यांनी ठाकरे यांच्यावर आरोप केले.1996 साली आपण,अर्जुन खोतकर यांच्यासह काही जणांना बोलावून घेत उद्धव यांनी मला मुख्यमंत्री करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव ठेवा असे म्हटले होते.त्यानुसार आम्ही सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली.त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवला अन त्यानंतर आपल्यावर शिवसेना सोडण्याची वेळ आली असे नवले म्हणाले.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या दसरा मेळाव्याला बीड जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक जाणार असल्याची माहिती यावेळी नवले यांनी दिली.यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,सचिन मुळुक ,चंद्रकांत नवले यांची उपस्थिती होती.