बीड- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राज्य शासनाने आज आरक्षण सोडत जाहीर केली.यामध्ये बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे.त्यामुळे आता या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील सर्वच जिल्हा परिषद, पंचायत समिती वर सध्या प्रशासक आहेत.ओबीसी आरक्षणावरून निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने फेब्रुवारी2022 पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राज आहे.
दरम्यान 30 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने 34 जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचे आरक्षण जाहीर केले.यामध्ये बीडचे अध्यक्षपद हे अनुसूचित जाती साठी राखीव झाले आहे.बीड सोबतच मराठवाड्यातील परभणी चे अध्यक्षपद देखील अनुसूचित जाती साठी तर औरंगाबाद चे सर्वसाधारण साठी आरक्षित झाले आहे.