December 10, 2022

विभागीय चौकशीच्या नावाखाली मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याची धडपड !

विभागीय चौकशीच्या नावाखाली मर्जीतल्या कर्मचाऱ्यांना वाचवण्याची धडपड !

बीड- जल जीवन मिशनच्या योजनेत कुटुंबातील सदस्यांना आणि जवळच्या गुत्तेदारांना कोट्यवधी रुपयांचा लाभ देणाऱ्या मर्जीतल्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्याऐवजी विभागीय चौकशी प्रस्तावित करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद प्रशासन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन कार्यक्रमात टेंडर क्लार्क शिवाजी चव्हाण,उप कार्यकारी अभियंता एम आर लाड या दोघांनी आपल्या मुलाला,मुलीला अन पुतण्याला चाळीस ते पन्नास कोटींची कामे बेकायदेशीर पध्दतीने दिल्याचे प्रकरण न्यूज अँड व्युज ने उजेडात आणले.त्यानंतर जिल्ह्यातील सर्व मीडियाने या प्रकरणात झालेल्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला.

या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी सहा सदस्यीय समिती नेमल्यानंतर विभागीय आयुक्त यांनी देखील चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण चांगलेच अंगाशी येणार हे लक्षात आल्यानंतर सीईओ पवार यांनी शिवाजी चव्हाण यांची शिक्षणविभागत बदली केली.

वास्तविक पाहता एखादा कर्मचारी प्रथमदर्शनी दोषी आहे हे लक्षात आले तर त्याची त्या विभागातून इतर तालुक्यात दुसऱ्या विभागात बदली करावी असे शासन निर्देश आहेत.मात्र येथेही चव्हाण यांना वाचवण्यासाठी आणि कारवाई केल्याचे दाखविण्यासाठी त्यांची बदली शिक्षण विभागात केली गेली.बदली शिक्षण विभागात झाली असली तरी चव्हान्हे मात्र दिवसभर सीईओ यांच्या केबिन जवळच असतात .

दरम्यान सीईओ पवार यांनी शिवाजी चव्हाण आणि एम आर लाड या दोघांसह आनेराव आणि वीर या कर्मचाऱ्यांना देखील शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी नोटीस बजावली आहे. परंतु पदावर असेपर्यंत हे कर्मचारी जर आपले लाड पुरवणार असतील तर त्यांच्यावर कारवाई करून कसे चालेल.

हा विचार करून या कर्मचाऱ्यांना निलंबन किंवा बडतर्फी मधून वाचविण्यासाठी आता त्यांची विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एकदा विभागीय चौकशी प्रस्तावित केली की त्यात मोठी दिरंगाई होते अन तोपर्यंत या कर्मचाऱ्यांवर कोणतीच कारवाई करता येतं नाही.

आपल्या लेकराबालांना कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून दिल्याचे जर सीईओ यांच्या लक्षात आले असेल अन जिल्ह्यातील मिडियामधून टीका होत असेल तर या दोषी कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून रक्कम वसुली ची कारवाई करणे अपेक्षित होते.पंरतु जिल्हा परिषद प्रशासन जाणीवपूर्वक या दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click