December 10, 2022

धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !

धनंजय मुंडे पंकजा मुंडेंमध्ये शाब्दिक चकमक !

बीड-रक्ताची नाती असली तरी आमच्या राजकीय वैर आहे अस म्हणणाऱ्या बंधू धनंजय मुंडे यांना रक्ताची नाती कधी संपत नसतात अन मी कोणाशी वैर धरत नाही अस म्हणत बहीण पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं.या दोन्ही बहीण भावात आज चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय पटलावर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोन्ही बहीण भावातील राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे.2012 पासून या दोघांनी आपले राजकीय मार्ग वेगळे केले अन दोघांमध्ये वैर सुरू झालं.हे वैर सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं अन अनुभवलं आहे.

माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे आणि आपल्यात नात असलं तरी राजकीय वैर आहे अन ते नात्यापलीकड आहे त्यामुळे माध्यमांनी काहीही रंगवण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होणार नाही अस म्हटलं.

याबाबत परळी येथे पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी म्हटले की,रक्ताची नाती कधी तुटत नसतात,कोण काय म्हणल याला मी महत्व देत नाही अन काहीही केलं तरी रक्ताची नाती तुटत नसतात.अन माझे कोणाशीही वैर नाही अस त्या म्हणाल्या.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click