December 10, 2022

एफडीए चे अधिकारी जागे झाले अन भगरीचे व्यापारी अंदर झाले !

एफडीए चे अधिकारी जागे झाले अन भगरीचे व्यापारी अंदर झाले !

बीड- काही व्यापाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील तमाम व्यापाऱ्यांकडून हप्ते गोळा करण्यात व्यस्त असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना उशिरा जाग आली अन त्यांनी भगर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचे नाटक केले.हेच जर अगोदर केले असते तर दोन अडीचशे लोकांच्या जीवाशी झालेला खेळ थांबला असता हे नक्की.

बीड जिल्ह्यातील अनेक गावांत घटस्थापणेच्या दिवशी लोकांना भगर खाल्याने विषबाधा होऊन त्रास झाला.बीड तालुक्यातील अनेक गावातील 200 पेक्षा अधिक नागरिकांना या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावे लागले.याबाबत स्थानिक वृत्तपत्र आणि मिडियामधून बातम्या आल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभाग खडबडून जागा झाला.

एफडीए चे अधिकारी हाश्मी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणी बीडच्या मोंढा भागातील प्रितेश खिंवसरा यांच्या ओम एजन्सी वर छापा घालून 1800 किलो भगर जप्त केली.या दुकानातून पाच हजार किलो भगर विक्री झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन कार्यरत आहे हे या कारवाईमुळे समोर आले आहे.अन्यथा बीड जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या हातचे बाहुले बनलेला हा विभाग आणि येथील अधिकारी हे केवळ तोडीपाणी करणे यासाठीच प्रयत्नशील असतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click