December 10, 2022

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नारायणा स्कुल सुरूच !

शिक्षणाधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नारायणा स्कुल सुरूच !

बीड- राज्य शासन अथवा जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांची कोणतीच परवानगी नसताना या वर्षीपासून सुरु झालेल्या नारायणा स्कुल वर नोटीस देण्यापलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही.शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी बोटचेपी भूमिका घेतल्याने आजही ही अनधिकृत शाळा बिनधास्त सुरू आहे.

हैदराबाद येथील नारायणा स्कुल च्या राज्यभरात अनेक ठिकाणी शाखा आहेत.मात्र कोणत्याही शहरात शाळा सुरू करावयाची असल्यास शिक्षण विभाग आणि राज्य सरकार यांची परवानगी लागते.

मात्र बीड शहरातील कॅनॉल रोडवर असलेल्या नारायणा स्कुल ला जिल्हा परिषद शिक्षण विभाग किंवा राज्य सरकार या दोन्हीची कोणतीच परवानगी नाहीये. या शाळेबाबत भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा सदस्य सय्यद ख्वाजा यांनी तक्रार केल्यानंतर शिक्षण विभागाने या शाळेची तपासणी केली.ज्यामध्ये शाळेला यु डायस नंबर नसताना देखील शाळा भरवली गेल्याचे उघड झाले.

त्यानंतर शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी या शाळेला त्वरित शाळा बंद करावी अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल अशी नोटीस पाठवली.मात्र ही नोटीस देऊन महिना उलटत आला तरी देखील शाळा बिनधास्त सुरूच आहे.शिक्षण विभागाचे आदेश धाब्यावर बसवून शाळा सुरू ठेवणाऱ्या या शाळेकडे शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांचेच अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याची चर्चा आहे.

याबाबत शालेय शिक्षण मंत्री आणि शिक्षण संचालक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला या शाळेवर गुन्हा दाखल करून टाळे ठोकण्यास नेमकी काय अडचण आहे हे न उलगडणारे कोडे आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click