December 10, 2022

हिटरचा स्फोट,महिलेचा मृत्यू !

हिटरचा स्फोट,महिलेचा मृत्यू !

केज – तालुक्यातील पिंपळगाव येथील सुरवसे कुटुंबासाठी पाणी तापवायचे हिटर जीवघेणे ठरले.पाणी तापवण्यासाठी लावलेल्या हिटरच्या पाण्यामुळे उषा सुरवसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.तीन चार तासापेक्षा अधिक काळ उकळत असलेले पाणी अंगावर सांडल्याने उषा यांना जीव गमवावा लागला तर पती हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई च्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

उषा आणि त्यांचे पती नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. झोपण्यापूर्वी त्यांनी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास याच खोलीत बाजूला असलेलं हे हिटर चालू केलं. पाणी गरम झाल्यानंतर त्या हीटर बंद करायला विसरल्या आणि रात्री दोनच्या सुमारास या टाकीतलं पाणी एवढं गरम झालं की टाकी फुटून पाणी उषा आणि त्यांच्या पतीच्या अंगाखाली आलं. गरम पाण्यामुळे उषा यांच्या शरीराचा अर्धा भाग पूर्णपणे भाजून गेला.

उकळतं पाणी अंगाखाली आल्याने उषा यांचं अर्ध शरीर तर भाजलंच, मात्र त्यांच्या पतीच्या पायालाही मोठी इजा झाली. सुदैवाने त्यांची तीन मुले दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. म्हणून त्यांना काही झालं नाही. भाजलेल्या अवस्थेत उषा आणि त्यांच्या पतीला अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांची तब्येत खालावत असल्याने त्यांना लातूरच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

उषा आणि त्यांचे पती ऊस तोडणीचं काम करतात. त्यांना एक मुलगा आणि तीन मुली असा त्यांचा परिवार आहे. मात्र पाणी तापवण्यासाठी आणलेल्या हीटरमुळे घात झाला आणि उषा यांना आपला जीव गमवावा लागला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click