January 30, 2023

तुळजापूर ला ज्योत घेऊन निघालेल्या दोन तरुणांचा मृत्यू !

तुळजापूर ला ज्योत घेऊन निघालेल्या दोन तरुणांचा मृत्यू !

आष्टी – नवरात्रनिमित्ताने तुळजापूर ला ज्योत घेऊन निघालेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने आष्टी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील गावातील ५० तरुण भाविक तुळजापूर येथे शनिवारी सकाळी निघाले होते. यातील एका दुचाकीला शनिवारी रात्री येरमाळा येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भास्करराव भोसले, अमोल सुरेशराव खिलारे अशी मृतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील तरूण दरवर्षी प्रमाणे नवरात्र उत्सवात देवीची स्थापना करतात. यासाठी तुळजापूर येथून तुळजाभवानी मातेची ज्योत आणण्याची प्रथा आहे. सोमवारी घटस्थापना असल्याने गावातील ५० तरूण भाविक शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास दुचाकी, टेम्पो, पिकअप अशा वाहनातून ज्योत आणण्यासाठी तुळजापूरकडे रवाना झाले. या भाविकांमधील महेश भोसले ( ३१ ), अमोल खिलारे (३८ ) हे दोघेजण दुचाकीवर निघाले होते.

दरम्यान, शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास येरमाळाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात भोसले आणि खिलारे दोघांचा जागीच मृत्यू झाला. महेश भोसले हा आरोग्यसेवक तर अमोल खिलारे उपसरपंच होते. दोन तरुणांच्या अपघाती निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click